जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा विवेकानंद नगर येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा…

हिवरा आश्रम :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा विवेकानंद नगर येथे शाळेचे सर्व शिक्षक वृंद व मेहकर वन विभाग यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सहाय्यक वन संरक्षक तथा उपविभागीय वन अधिकारी मेहकर वैभव काकडे उपस्थित होते. काकडे साहेब यांचे स्वागत विवेकानंद आश्रम चे विश्वस्त तथा केंद्रप्रमुख श्री अकोटकर सर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. वनपरिक्षेत्र अधिकारी मेहकर प्रादेशिक रवींद्र सातपुते, वनपाल वसंतराव फुके, व इतर कर्मचारी, माजी सरपंच मनोहर पाटील, उपसरपंच रमेश गिरी, विवेकानंद आश्रम चे उपाध्यक्ष अशोक भाऊ थोराहते, सचिव संतोष गोरे सर, विश्वस्त व केंद्रप्रमुख पुरुषोत्तम अकोटकर सर, मुख्याध्यापक प्रकाश दुनगु सर, संजय पवार सर, सविता पवार मॅडम, अनिता अकोटकर मॅडम, मीना सजगुरे, संदीप पुरी सर, गंगाधर निकस सर, गिरी सर, पोलीस पाटील रवींद्र घोंगडे, आकाशवाणी कलावंत ईश्वर दादा मगर, गजानन अवचार, निकस सर, आरिफ शहा, तसेच गावातील नागरिक व शाळेचे विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली.
काकडे साहेब यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व सर्व उपस्थित नागरिकांना पर्यावरणाचे व वृक्ष संवर्धन याचे महत्त्व पटवून दिले . प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संरक्षण करावे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दूनगुस सरांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सातपुते साहेब यांनी मानले आहे. हा कार्यक्रम अतिशय आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला.