कत्तलीच्या उद्देशाने कोंबून ठेवलेल्या 16 गोवंशाच्या सुटका; गुन्हा दाखल
मलकापूर शहर पोलिसांची प्राणी संरक्षणाची कर्तव्य भूमिका

मलकापूर:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे:- मलकापूर प्राप्त माहितीनुसार क्षणाचाही विलंबना न करता प्राणी संरक्षण व प्रशासकीय कर्तव्याच्या पूर्ततेसाठी मलकापूर शहर पोलिसांची आजची भूमिका नक्कीच कौतुकास्पद आहे, कत्तलीच्या उद्देशाने कोंबलेल्या 16 गोवंश ची सोडवणूक करून सुरक्षित स्थळी हलवण्यात पोलिसांनी केलेली कर्तव्याची भूमिका प्राणी संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महत्वपूर्ण ठरली आहे
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर तब्बल 16 गोवंश मलकापूर शहरातील पारपेट भागातील हाशमी नगर येथील टिनाच्या गोठ्यात 16 गोवंश कोंबून ठेवल्याची गुप्त माहितीच्या आधारे मलकापूर शहर पोलिसांनी सापळा रचून धाड टाकून 16 गोवंशांचा जीव वाचवला ही घटना दिनांक 6 जून रोजी सायंकाळी पाच वाजेचा दरम्यान घडली असून सर्व गोवंश 14 नंदी, एक गाय, एक वासरू असून याची वैद्यकीय तपासणी करून मलकापूर येथील बेलाड गौरक्षण मध्ये सुखरूप ठेवण्यात आल्याची माहिती मलकापूर शहर पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांनी दिली तसेच संबंधितावर कारवाई केल्याचे सागितले आहे.