बुलढाण्यात बकरी ईद नमाज पठण करून उत्साहात साजरी

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-बुलढाणा देशभरासोबतच बुलढाणा शहरातही बकरी ईद (ईद-उल-अधा) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील मोती मस्जिद येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सकाळी सामूहिक नमाज पठण केले.यावेळी उपस्थित मुस्लिम बांधवांनी देशात जातीय सलोखा, एकता आणि शांतता टिकून राहावी, तसेच सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना केली.यंदा बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याने अनेक मुस्लिम बांधवांनी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला.
मौलाना हाफिज रहमत कुरेशी (जामा मस्जिद, बुलढाणा) यांनी आपलं बुलढाणा जिल्हा बातमी या news चैनल शी बोलताना सांगितले की, “बकरी ईद ही त्याग व श्रद्धेचे प्रतीक आहे. समाजात प्रेम, शांतता आणि बंधुभाव वाढावा, हाच ईदचा खरा संदेश आहे.”शहरातील विविध ठिकाणीही नमाज पठण आणि ईद साजरी करण्याचे कार्यक्रम शांततेत पार पडले.