विकसित कृषी संकल्प यात्रेत केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव 9 जूनला होणार सहभागी … !
केळवद येथील कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषी विज्ञान केंद्र , आत्मा आणि कृषी विभागाने केले आवाहन ...!!

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी):-ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेती विषयक समस्या शेत बांधावर जाणून समजुन घेवून त्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्यावतीने विकसित कृषी संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे . या कृषी विकसित संकल्प यात्रेमध्ये केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव सहभागी होणार आहे .त्यानिमित्त केळवद येथे एका कार्यक्रमाचे आयोजन 9 जून रोजी करण्यात आला आहे .
‘प्रयोगशाळेतून जमिनीवर’ वैज्ञानिक संशोधन थेट शेतातील बांधावर नेण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्यावतीने विकसित कृषी संकल्प अभियान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे . या अभियानादरम्यान भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली, डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांचे शास्त्रज्ञ तसेच कृषी आणि आत्मा विभागाचे अधिकारी कर्मचारी या अभियानात सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे . 9 जून रोजी सकाळी १० वाजता विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत एका कार्यक्रमाचे आयोजन चिखली तालुक्यातील केळवद येथे सकाळी दहा वाजता करण्यात आले आहे . या कार्यक्रमांमध्ये केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव सहभागी होणार आहेत . या कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना खरीप पिकांचे सुधारित लागवड तंत्रज्ञान, मृदा परिक्षण , ड्रोन प्रात्यक्षिके , कृषी संदर्भातील विविध योजना संदर्भातील माहितीही देण्यात येणार आहे . या कार्यक्रमाला शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे अस आवाहन डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ अंतर्गत,कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि आत्मा बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.