आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईच्या चरणी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव झाले नतमस्तक …!
वारकऱ्यांना हात जोडून केले अभिवादन ...!!

बुलडणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) सुखी संसाराची सोडूनिया गाठ …पाऊले चालली पंढरीची वाट …आषाढी एकादशीनिमित्य विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेली आदिशक्ती श्रीसंत मुक्ताईंची पालखी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून पंढरपूराकडे मार्गस्थ होत आहे. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल राजुरच्या घाटात आदिशक्ती श्रीसंत मुक्ताबाईच्या पालखीचे दर्शन घेऊन ते मुक्ताई चरणी नतमस्तक झाले . दिंडीतील वारकऱ्यांना अभिवादन करत त्यांनी वारीप्रवासाच्या शुभेच्छा दिल्या …
जळगाव जिल्ह्यातील आदिशक्ती श्रीसंत मुक्ताबाईची पालखी ही आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे तापीतीर तर भीमातीर असा 750 किलो किलोमीटरचा प्रवास 30 दिवसात पूर्ण करून ही पालखी पंढरपूरला पोहोचत असते पालखीचे हे 318 वर्ष असून ज्ञानदेव तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल आणि मुक्ताबाईंच्या नामाचा गजर करीत ही पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात या पालखीचे आगमन झाल्यानंतर केंद्रीय आयुष्य आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पालखीतील वारकऱ्यांना अभिवादन करत आदिशक्ती श्रीसंत मुक्ताबाईला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले तर वारीचे नेतृत्व करत असलेले रविद्र हरणे महाराज यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व आशीर्वाद घेतले वारकऱ्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात वारीच्या चरणी केद्रियमंत्री प्रतापराव जाधव नतमस्तक झाले यावेळी शिवसेना पदाधिकारी व वारकरी बांधव उपस्थित होते…