मुक्ताई कॉन्व्हेन्ट, माळविहीर बुलडाणा येथे प्रवेशोत्सव उत्साहात….

बुलढाणा –आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-माळविहीर येथील मुक्ताई कॉन्व्हेन्ट शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे फुलं, टिळा व गिफ्ट देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ.जगन्नाथ श्रीराम गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे सचिव राम श्रीराम गावंडे यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. मुख्याध्यापिका सौ. भाग्यश्री देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला.शाळेत प्रोजेक्टर शिक्षण, संगणक प्रयोगशाळा, सुरक्षित बस सेवा, दररोज गृहपाठ आदी सुविधा उपलब्ध असून, गुणवत्ता आणि संस्कारयुक्त शिक्षण हेच शाळेचे प्रमुख ध्येय असल्याचे यावेळी सांगण्यात आला.कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक संजय साखरे तसेच सर्व शिक्षिका उपस्थित होते.