Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

योगाच्या सामर्थ्याने जागतिक आरोग्य आणि शांततेच्या दिशेने भारताचे नेतृत्व….!

केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्य केली कार्यक्रमांची घोषणा ...!!

Spread the love

बुलडाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी):-  योगाच्या सामार्थ्याने जागतिक आरोग्य आणि शांततेच्या दिशेने भारताचे नेतृत्व अधिक सक्षम होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी आज 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन (IDY) 2025 च्या कर्टेन रेज़र (curtain raiser) कार्यक्रमात केले.

केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय मीडिया केंद्र येथे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि निमंत्रित पाहुण्यांनाच्या समक्ष कर्टेन रेज़र (curtain raiser) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी केद्रीयमंत्री प्रतापराव जाधव बोलत होते. यावर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष महत्त्वाचा आहे, असे सांगून श्री जाधव म्हणाले, हे वर्ष जागतिक उपक्रमाच्या यशस्वी दशकपूर्तीचे प्रतीक आहे. यावर्षीची संकल्पना “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” अशी आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 मार्च रोजी ‘मन की बात’ कार्यक्रमात केली होती, अशी माहिती श्री जाधव यांनी यावेळी दिली. ही संकल्पना केवळ वैयक्तिक आरोग्यापुरती मर्यादित नसून, जागतिक समन्वय आणि शांततेसाठी योगाची क्षमता अधोरेखित करते, असे श्री जाधव यांनी यावेळी म्हणाले.

यावर्षी दि. 21 जून 2025 रोजी मुख्य कार्यक्रम आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे पार पडणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी योग प्रदर्शनाचे नेतृत्व करणार आहेत. आंध्र प्रदेश सरकारने दहा लाख नियमित योग साधकांचे नेटवर्क उभे करण्याचे निश्चित केले असल्याची श्री जाधव यांनी यावेळी सांगीतलेआंतरराष्ट्रीय योग दिन 2025 अंतर्गत आयुष मंत्रालयाने 10 महत्वपूर्ण उपक्रम प्रोत्साहित केले आहेत यात योग बंधनः 10 देशांसोबत भागीदारीत संयुक्त कार्यक्रम ,योग कनेक्टः जागतिक योग परिषद, हरित योगः पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण मोहिम,  योग अनप्लग्डः तरुणाईसाठी प्रेरणादायी उपक्रम, योग समावेशः दिव्यांग आणि विशेष गटांसाठी योगाचे समावेशक कार्यक्रम, योग प्रभावः योगाचे सामाजिक परिणाम मोजणारा अभ्यास, योग महाकुंभ, संयोग व योग पार्क्सः एकत्रित सहभागासाठी 1,000 योग उ‌द्यानांची योजना असे लोकोपयोगी तसेच प्रेरणादायी उपक्रम हाती घेतले असल्याचे श्री जाधव यांनी यावेळी सांगितले.

योग दिनाच्या पूर्वसंध्येला नाशिकसह दिल्ली, भुवनेश्वर, व पुडुचेरीसारख्या ठिकाणीही अनेक काउंटडाउन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.श्री जाधव यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना आवाहन केले की त्यांनी यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला ऐतिहासिक व प्रेरणादायी बनवण्यासाठी सरकारला साथ द्यावी. त्यांनी नमूद केले की, “योग ही केवळ शारीरिक क्रिया नसून, तो शिस्त, संयम आणि सकारात्मकतेचा संदेश देणारी जीवनशैली आहे.” कार्यक्रमाच्या शेवटी श्री जाधव यांनी आशा व्यक्त केली की, सर्वाच्या सहभागातून आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 हा एक केवळ कार्यक्रम न राहता एक जागतिक जनआंदोलन बनेल, जे लोकांना आयुष्यभर योग अंगीकारण्याची प्रेरणा देईल. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page