पाडळी येथे भाजपाची संकल्प से सिद्धी तक विकसित भारत संकल्प सभा संपन्न!

बुलढाणा:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळातील विविध विकासकामांचा तसेच विविध लोकोपयोगी कल्याणकारी योजना संदर्भात जनजागृती व येत्या 2047 पर्यंत भारत देशाला विकसित भारत बनवण्यासाठी संघटित प्रयत्नांचा भाग म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभर संकल्प से सिद्धी तक विकसित भारत संकल्प सभांचे आयोजन करण्यात येत आहे.
या सभांच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या सूचनेवरून महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांतील प्रत्येक मंडळांमध्ये संकल्प सभांचे आयोजन करण्यात येऊन लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचे काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत आहेत.याचाच भाग म्हणून बुलढाणा तालुक्यातील पाडळी येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने विकसित भारत संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संकल्प सिद्धी अभियानाचे जिल्हा संयोजक चंद्रकांत बद्रे, तालुका अध्यक्ष सतीश भाकरे पाटील, जिल्हासचिव तथा बाजार समिती संचालक सुनील देशमुख, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.सुरुवातीला मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आल्यानंतर सर्व वक्त्यांनी विकसित भारताच्या संकल्पावर आपली मते उपस्थितांसमोर मांडली.यामधून मोदी सरकारच्या सेवा, सुशासन, गरीबकल्याणकारी विकास कामांवर व्यापक चर्चा करण्यात आली.सोबतच विकसित भारताच्या स्वप्नांवर काम करण्याचा निर्धार करण्यासाठी युवा वर्गाने कंबर कसली पाहिजे अशी अपेक्षा उपस्थित वक्त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.
या सभेच्या आयोजनासाठी संकल्प से सिद्धी तक अभियानाचे मंडळ संयोजक शरद एकडे, सहसंयोजक प्रवीण गाडेकर, राजेश पाठक, अमोल पडोळ यांच्यासह पाडळी येथील जिगरबाज युवा वर्गाने प्रचंड मेहनत घेतली.
यावेळी उपस्थितांमध्ये अयोध्या मंदिर कारसेवक समाधान वैद्य, भाजपा तालुका उपाध्यक्ष सुरेश पाटील, पाडळी येथील प्रगतशील शेतकरी नेताजी पवार, माजी सरपंच रवींद्र पवार, माजी उपसरपंच समाधान डुकरे, माजी सैनिक रामदास काकडे, प्रा.निलेश राजकुमार, डॉ.अनंता माडोकार, अनंत डुकरे, मंगेश पवार, सतीश गायकवाड, गणेश जाधव, सुनील पवार, मिलिंद जाधव, राजेंद्र दळवी, गजानन पिसोळे, विजय हिवाळकर, संजय जुंबड, आनंदा डुकरे, सतिश देहाडराय, अमोल पडोळ, सारंगधर एकडे, सुधाकर वानरे, राजू जाधव, भरत शेजोळ, समाधान पाटील जाधव, दिनकर मुळे, प्रकाश शेळके, सागर पाटील, रामू पैठने, सोपान जगताप, रामदास उबाळे, श्रीकृष्ण खंडागळे यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.सदर सभेचे उत्कृष्ट सूत्रसंचालन भाजपा युवा नेते योगेश राजपूत यांनी केले तर आभारप्रदर्शन युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण गाडेकर यांनी केले.