निशुल्क योगा शिबिरास आज पासून सुरवात….

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-अंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिनांक 16/06/2025 ते 21/06/2025 पर्यंत रिया वेलनेस आणि फिटनेस सेंटर धर्मवीर आखाडा, बुलढाणा च्या वतीने सर्व बुलढाणा वासियांन करीता निशुल्क शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आज दिनांक 16 जून रोजी शिबिराचे उदघाटन करण्यात आले यावेळी रिया वेलणेस आणी फिटनेस सेंटर च्या संचालिका सौ रोहिणी देशमुख मॅडम, तसेंच बुलडाण्यात योगा साठी प्रसिद्ध असलेले योग गुरु श्री उबरहांडे सर यांनी योगाचे महत्व सांगून आजचा योगा वर्ग घेण्यात आला, यावेळी बुलडाण्यातील अनेक नागरिकांनी या निशुल्क शिबिरास उपस्थिती दर्शवली तसेच या शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान रिया वेलणेस आणी फिटनेस सेंटर च्या संचालिका सौ रोहिणी देशमुख मॅडम यांनी केले…