पहिला विधवा विवाह घडून येण्यास आज झाली 116 वर्ष….
महाराष्ट्रात विधवा महिला आजही दयनीय स्थितीत - प्रा. डी. एस. लहाने

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- आजचा दिवस महाराष्ट्रातील समाजप्रबोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस मानला जातो. महाराष्ट्रात पहिला विधवा विवाह सोहळा 1865 म्हणजे आज झाला. या घटनेला 156 वर्ष उलटली आहेत. दरम्यानच्या काळात फुले दांपत्य ,ईश्वरचंद्र विद्यासागर, धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या कर्त्या समाज सुधारकांनी विधवांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आजही परिस्थिती फारशी बदलली नाही. विधवांच्या जीवनात उजेड पेरण्यासाठी महाराष्ट्रामध्ये विधवा विवाहाची चळवळ नेटाने पुढे नेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक डीएस लहाने (बुलडाणा ) यांनी केले आहे.
बुलढाणा येथे मानस फाउंडेशन च्या माध्यमातून प्रा. डी एस लहाने यांनी विधवा विवाह चळवळ सुरू केली आहे. त्याला महाराष्ट्रामध्ये चांगला प्रतिसादही मिळत आहे. अनेक ठिकाणी विधवा विवाह सोहळे तर काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी विधवा प्रथेच्या विरोधात आदेश काढले आहेत. मात्र या कामाला सामाजिक प्रतिष्ठा देण्याची गरज असल्याचे प्राध्यापक डी एस लहाने यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.पुढे बोलताना ते म्हणाले… बुलढाणा मध्ये विधवा विवाहाची चळवळ आम्ही हाती घेतली तेव्हा याला कितपत प्रतिसाद मिळेल यात शंका होती.सुरुवातीला एक दोन जोडपे ही तयार होईना,मात्र गेल्या दोन वर्षापासून ही चळवळ जोराने सुरू झाली आहे. आतापर्यंत 200 पेक्षा अधिक विधवा महिलांचे लग्न लावून देण्यात आम्हाला यश आले. विधवांना स्वीकारा त्यांच्यापेक्षा त्यांच्या मुलांवर अधिक प्रेम करा या टॅगलाईन खाली आमचे कार्य सुरू आहे. ते पुढे म्हणाले आजच्या दिवशी महाराष्ट्रातील पुणे येथे गोखले बागेत १८६९ साली पहिला विधवा विवाह पार पडला. प्राचीन समाजांमध्ये (उदा., इजिप्तच जर्मनी या देशांतील) विधवेला तिच्या मृत पतीच्या थडग्यात जिवंत पुरत असत. प्राचीन भारतीय धर्मशास्त्रे व नीतिनियम यां नुसार विधवेला पतीच्या मरणास कारणीभूत धरल्याने, ती पापी व अमंगल आहे ही समाजाची धारणा बनली. तिने कुटुंबातील मंगल प्रसंगी उपस्थित राहू नये, असा प्रघात पडला.
विधवा स्त्रीने सुतक किती दिवस पाळावे, या काळात तिनेvकोणते वस्त्र परिधान करावे, तिने घराबाहेर पडावे की नाही, कोणाशी बोलावे, कोणते अन्न किती वेळा ग्रहण करावे, यांबद्दलही विविध समाजांत विभिन्न बंधने विधवेवर लादलेली दिसून येतात. पति निधनाचे पातक धुऊन काढण्याकरिता अगर प्रायश्चित्त म्हणून ही बंधने तिने पाळलीच पाहिजेत, असा समाजाचा दंडक असे. प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृतीमध्ये विधवांच्या पुनर्विवाहाला फारसे प्रोत्साहन नव्हते. तरुणपणी वैधव्य आलेल्या स्त्रीची यामुळे अतिशय कुचंबणा होत असावी. तिच्याकडे संशयाने पाहण्याचा दृष्टिकोन सर्वत्र आढळतो. तिच्यावर परपुरुषाची नजर जाऊ नये, म्हणून अनेक जाचक निर्बंधांबरोबर तिचे केशवपन करण्याची क्रूर चाल भारतात निर्माण झाली.मृत पतीच्या बरोबर पत्नीने सहगमन करण्याच्या अथवा सतीच्या चालीचा प्रचार झाला आणि विधवेला सती करून व जबरदस्तीने पतीच्या चितेवर जाळण्याचे प्रकार घड़ लागले.ही प्रथा समाजामध्ये चांगलीच बोकाळली होती. मात्र पुण्यात विधवांच्या पुनरुत्थानासाठी फुले दांपत्य जोरकसपणे पुढे आले. फुले दांपत्य यांच्याप्रमाणे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि इतर प्रभुतींनी सुद्धा कार्य केले आहे. पहिला विधवा विवाह सोहळा घडून येण्याला आज 116 वर्षे पूर्ण झाली मात्र आजही विधवांची स्थिती फारशी बदललेली नाही. विधवा विवाहासाठी आजही प्रयत्न करावे लागतात. त्यांना अनेक अडचणी आहे.कौटुंबिक समस्या,आर्थिक समस्या आहेत.या कुचुंबनेला त्यांना सामोरे जावेच लागते. हा दृष्टिकोन बदलण्यासाठी समाज धुरीणांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. बुलढाण्यात गेल्या काही वर्षापासून मानस फाउंडेशनच्या माध्यमातून प्राध्यापक डीएस लहाने यांनी विधवासाठी अनोखे कार्य हाती घेतले आहे.