महात्मा फुले रोडवरील दोन खांबावरील 34 मीटर जळून खाक

देऊळगाव राजा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-शहरातील महात्मा फुले रोडवरील 34 मीटर जळून खाक झाले आहे.
देऊळगाव राजा शहरातील महात्मा फुले रोडवरील खरेदी विक्री संघा जवळ असलेल्या पोलवर आणि आप्पा खुळे यांच्या किराणा दुकान समोर असलेल्या पोल या दोन्ही पोलवरील इलेक्ट्रिक मीटर ला रात्री तीन वाजे दरम्यान आग लागली या आगीमध्ये 34 मीटर जळून खाक झाले खरेदी विक्री संघा जवळ असलेल्या पोलजवळ विविध उत्सवात वापरण्यात येणारा आर्टिफिशियल स्नो स्प्रे पडलेला असल्याने ही आग लागली नसून कुणीतरी लावली आहे अशी कुणकुण स्थानिकांमध्ये आहे. सहा महिन्यात एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा घडलेली ही घटना असून कुणीतरी जाणून बुजून करीत असल्याचा किंवा सदर परिसरात वीज चोरी लपवण्यासाठी करण्यात येणारा प्रयोग असल्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र ही घटना दुसऱ्यांदा घडत असल्याने यामध्ये महावितरणचे सहा महिन्यापूर्वी 34 आणि दिनांक 19 जून रोजी सकाळी 34 असे एकूण 68 मीटर जळाले असून महावितरण चे जवळपास एक लाखाचे नुकसान झाल्याची माहिती सहाय्यक अभियंता नागरे यांनी दिली.