Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

अवैध  गो तस्करी विरुद्ध नांदुरा पोलिस द्वारे मोठी कार्यवाही गुन्हा दाखल….

Spread the love

मलकापूर :- आपलं  बुलढाणा जिल्हा बातमी:- प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे :-नांदुरा पोलिस यांना काही गोपनीय सूत्रा द्वारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 06 वरून नांदुरा कडे गोवंश निर्दयतेने वाहतूक करणारे 3 ट्रक / आईशर मध्ये गो वंश तस्करीची सूचना मिळाली या माहिती च्या आधारावर नांदुरा पोलिस यांनी सापळा रचून 3 आईशर मधून 59 जखमी गोवंश जप्त करून महादेव गोरक्षण संस्था येथे उपचार कामी दाखल केले एकूण 38.91.000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि. 18/06/25 रोजी नांदुरा पोलिसांना महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग समिती चे सदस्य उद्धव नेरकर यांनी माहिती दिली कि मलकापूर वरून 3 ट्रक आईसर गाड्या मधये गोवनंश ज्यात गाय, बछडे हे जबरजस्तींने कोंबून वाहतुक क्षमता पेक्षा जास्त गायी व बछडे हे निर्दयतेने वाहतूक करीत आहेत त्यावरून नांदुरा पोलिसांनी मलकापूर नाक्यावर नाकाबंदी करून 3 गोवंश वाहतूक करणारे ट्रक पकडले असता त्या 3 ट्रक मध्ये 42 गायी व 17 बछडे एकूण 59 गोवनश हे बिनापरवाना निर्दयीपणे वाहतूक करताना त्यांना कमी जागेत दाटी वाटीने कोंबून जबर्जस्तीने कमी जागेत लहान दोर ने बांधून, त्यांना कोणतेही अन्न पाणी सुरक्षा नं देता ते मार लागून जखमी झाल्याचे दिसून आलेत, त्यावरून नांदुरा पोलिसांनी ते गायी बच्चडे हे अनंनपाणी व उपचार निवारा करिता महादेव गोरक्षण संस्था आमसरी येथे दाखल केले.4 आरोपीना त्यात अटक करून 3 ट्रक 59 गोवंश असा एकूण 38.91.000 रुपयांचा गोवानशाचा मुद्देमाल 4 आरोपीकडून नांदुरा पोलिसांनी जप्त केला आहे व फिर्यादी अनिल गोराने यांच्या तक्रारी वरून 4 आरोपीविरुद्ध प्राण्यांना निर्दयीते ने वागविणे कलम 11. मोटार वाहन कायदा कलम 66+192 कलमनवये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक विलास पाटील, सपोनि जगदीश बांगर, PSI इंगळे बाबा,ASI जवंजाळ, HC मुंजाळ, कैलास सुरडकर, अनिल गोराणे पंकज डाबेरावं, रवी सावळे शकील तडवी यांनी आज नांदुरा येथे केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page