चक्क घोरपडीच्या तोंडात अडकली खाली सुलोचनची बाटली…
घोरपडीच्या तोंडातून एका तासानंतर बाटली काढण्यात पत्रकार रविंद्र गव्हाळे यांना यश...

मलकापूर:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे:- आपण आपल्या सुख सुविधांसाठी अनेक प्रकारच्या वस्तू वापरतो आणि त्यांचा उपयोग झाला की फेकून देतो परंतु त्या फेकलेल्या वस्तूंमुळे निसर्गातील झाडे, प्राणी, जीव जंतू यांना त्यापासून खूप मोठा धोका निर्माण झाला आहे आपण आतापर्यंत बघितलं होतं की एखाद्या मांजरीच्या तोंडामध्ये घरातील एखादी वस्तू अटकली, कुत्र्याच्या तोंडामध्ये प्लास्टिकचा डबा अडकला, गायीच्या तोंडामध्ये एखादी बाटली अटकली असं बघितलं होतं परंतु आज घोरपडीच्या तोंडामध्ये खाली पत्र्याचा छोटासा डबा अडकला हे आपण पहिल्यांदाच ऐकणार आहात हो खरंच एका घोरपडीच्या तोंडामध्ये खाली सुलोचनचा पत्र्याचा डबा अडकला ज्यामुळे घोरपडीला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता आणि ते इकडे तिकडे फिरत होती परंतु अचानक मला ते दिसल्यामुळे मी तिच्या तोंडून तो काढण्याचा प्रयत्न केला परंतु खूप प्रयत्न केल्यानंतरही तो निघत नव्हता नंतर तिला एका हाताने तिची मान पकडली आणि दुसऱ्या हाताने तो डबा हलक्या हाताने ओढत ओढत तो काढला आणि घोरपड घाबरलेल्या परिस्थितीत खूप पडत सुटली त्यामुळे आज त्या घोरपडीचा जीव वाचला. आधीच निसर्गामधून नामशे होत असलेल्या मार्गावर ही प्रजाती आहे मानवापासून तिच्या जीवाला धोका आहे आजच्या घडीला घोरपडीची शिकार खूप मोठ्या प्रमाणात केली जाते घोरपडीचा एवढा मोठा इतिहास असताना आज ती इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे . म्हणून मित्रहो लक्षात असू द्या आपल्या परिसरामध्ये जे आपण वापरलेले लोखंडी पत्र्याचे असे छोटे मोठे डबे जे वापरून फेकून देतो ते सहज असे फेकू नका त्यामुळे कुठल्यातरी प्राण्याचा जीव जाऊ शकतो.