भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मलकापुरचे वतीने विज वितरण कार्यालयावर डफडे बजाव आंदोलन

मलकापूर:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे:-आज शुक्रवार दिनांक 20 जून रोजी मलकापुर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना वारंवार होत असलेल्या विजेच्या लपंडावच्या विरोधात (खंडित विज पुरवठा), लोबकळलेली तारे, कमी दाबाच्या डिपी न बदलने, नवीन डीपी न बसवीने इत्यादी त्रासा विरोधात विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत तथा येत्या आठ दिवसात परिस्थिती न बदलल्यास लोक हितास्त्वव तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने इशारा देत डफडे वाजवित, महाराष्ट्र शासन तथा विज वितरण कमानीचे निषेध व्यक्त केले.
या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष राजु पाटील, बंडूभाऊ चवरे, प्रमोददादा अवसरमोल, जावेद कुरेशी, संभाजी देशमुख, उस्मान मास्टर , रईस जमादार, किसनराव पाटील, अनिलभाऊ गांधी, अतामास्टर जमादार , सिद्धांत इंगळे, हरीश सिद्धीक सुपडू, फिरोज खान , तुषार पाटील, शेरू खान , जाकीर मेमन, विनय काळे, ज्ञानदेव तायडे ,जावेद ठेकेदार , वाजिद खान, दिलीप गोळीवाले, ईश्वर भदाले, रामेश्वर गोरले, भूषण सनिसे, विजयबाप्पा निर्मल, भींगू दादा , फिरोज पटेल इत्यादी लोक उपस्थित होते…