उद्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गुरुकुल ज्ञानपीठ सागवन येथे एक दिवसीय योग शिबिराचे आयोजन!

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-संपूर्ण जगाला अध्यात्मा सोबतच निरोगी आणि स्वस्थ आयुष्यासाठी योगाभ्यासाची शिकवण देणाऱ्या व आपल्या भारतीय संस्कृतीतून उगम पावलेल्या योगाचा प्रचार प्रसार होण्यासाठी दरवर्षी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो.
प्रत्येकाने आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये योगाचा सहभाग करून आपल्या सोबत आपल्या कुटुंबाचा शारीरिक व मानसिक सुख समाधानासाठी अवलंब केला पाहिजे.प्रत्येकामध्ये योगाची आवड निर्माण झाली पाहिजे तसेच येणाऱ्या नवीन पिढीला योग साधनेचे महत्त्व कळाले पाहिजे म्हणून देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासोबत अनेक भारतीय आध्यात्मिक गुरूंनी संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी योगाचे महत्त्व ओळखून याचा जास्तीत जास्त लोकांनी अंगीकार करावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.त्याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा भारताच्या या भूमिकेचे स्वागत करत संपूर्ण जगाने 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.त्या माध्यमातून देश विदेशात योगाबद्दल व्यापक प्रचार प्रसार माहिती आदान प्रदान आणि विविध सामूहिक उपक्रम घेऊन या महत्त्वपूर्ण विषयाचा अंगीकार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येत असते.आयुष्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी प्रत्येकानेच आपल्या जीवनात योग अंगीकारावा यासाठी बुलढाणा तालुक्यातील गुरुकुल ज्ञानपीठ सागवन येथेही आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचे नियोजन *दिनांक २१ जून २०२५ वार शनिवार रोजी सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत* करण्यात आले आहे.तरी सर्व नागरिकांनी या एक दिवसीय योग शिबिराचा लाभ घेऊन एक निरोगी व शांतीपूर्ण आयुष्याची नवी सुरुवात आंतरराष्ट्रीय योग दिनी करावी असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष तथा मा.आ.विजयराजजी शिंदे, गुरुकुल ज्ञानपीठचे संस्थापक डॉ.मधुसूदनजी सावळे व भाजपा तालुका अध्यक्ष सतीश भाकरे पाटील यांनी केले आहे.