बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियमवर सामूहिक योग प्रात्यक्षिके करून योग दिन साजरा

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियम येथे योग साधनेचे प्रात्यक्षिके प्रात्यक्षिके सादर करून योग दिन साजरा करण्यात आला
” एक पृथ्वी आरोग्यासाठी योग ” हे या वर्षीच घोषवाक्य एक पृथ्वी, एक आरोग्य यासाठी योग या संकल्पनेवर आधारित यंदाचा योग दिन कल्याणकारी एकात्मिक दृष्टिकोन देणारा ठरणार आहे. “सर्वे सन्तु निरामयः ” (सर्व रोगमुक्त होऊ देत) या भारतीय नीति तत्त्वातून मानव आणि ग्रहांच्या आरोग्याच्या परस्परसंबंधावर यामध्ये भर दिला आहे.
यावर्षीचा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियम येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच संगीतमय योगा क्षितिज निकम यांनी सादर केला त्यानंतर योग्य शिक्षिका अंजली परांजपे योगशिक्षक प्रशांत लहासे यांनी उपस्थित त्यांना योग चे महत्व विषद करत योगासने करून योग दिन साजरा केला.जिल्हाधिकारी किरण पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अतिरिक्त पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख विद्यार्थी महिला लहानांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वजण या योगाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते.