इंजिनीयर ज्योती खरे शास्त्रीय गायन विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

बुलढाणा:(आपलं बुलढाणा जिल्हा बातमी)- सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा येथे कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असलेल्या तथा स्वरविहार संगीत विद्यालयाच्या विद्यार्थिनी ज्योती खरे ह्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई द्वारा आयोजित प्रवेशिका पूर्ण परीक्षेत शास्त्रीय गायन विषयांमध्ये प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांनी ही परीक्षा केंद्र क्रमांक 887 स्वरसाधना संगीत विद्यालय बुलढाणा येथून उत्तीर्ण केली आहे. ज्योती खरे यांचा सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये प्रशासनाचा दांडगा अभ्यास असून त्या एक शिस्तप्रिय व प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.तसेच त्या एक मधुर व दमदार आवाजाच्या गायिका म्हणून सुपरिचित आहेत. सध्या त्या स्वरविहार संगीत विद्यालयांमध्ये नियमितपणे शास्त्रीय गायनाचे धडे घेत आहे.या परीक्षेसाठी त्यांना स्वरविहार संगीत विद्यालयाचे संचालक प्रा.रविकिरण मोरे यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण सर्वजनिक बांधकाम विभाग तसेच संगीत क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे..