अम्लिको आर.एम.सी. मुंबई, जिल्हा प्रशासन व भाजपा महिला मोर्चा बुलढाणा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव वाटप संपन्न!

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून अम्लिको आर.एम.सी. मुंबई, बुलढाणा जिल्हा प्रशासन व भाजपा महिला मोर्चा बुलढाणा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने हात पाय इत्यादी साहित्य पुरविणे याकरिता तपासणी व वाटप, शिबिराचे आयोजन दिनांक 20 जून 2025 रोजी शुक्रवारला बुलढाणा जिल्हा प्रशासनाद्वारे बुलढाणा पंचायत समिती सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये बुलढाणा तालुक्यातील विविध गरजू दिव्यांगांनी लाभ घेत त्यांना कृत्रिम हात पाय बूट इत्यादी साहित्याची वाटप करण्यात आले.या शिबिराला दिवसभरात सामाजिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी भेटी दिल्या. त्यामध्ये भाजपा नगरसेवक वैभव इंगळे, बुलढाणा शहर भाजपा नेते नारायण भाऊ हेलगे, पंचायत समिती सदस्य संदीप उगले, नगरसेवक सिंधुताई खेडेकर, युवा नेते राजू नाटेकर यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी भेट देऊन गेले.
सदर शिबिरासाठी भारतीय जनता पार्टी बुलढाणा महिला जिल्हाध्यक्ष सौ स्मिताताई महेश चेकटकर, भाजपा तालुका अध्यक्ष सतीश भाकरे पाटील, महिला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संगीताताई पवार, नितीन पंडित, किरण राऊत, भागवत जाधव, सागर पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासन, अम्लिको आर.एम.सी. मुंबई यांची टीम यांनी हे दिव्यांग शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.