आज मेहकर येथे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचा हस्ते आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राचे भूमिपूजन ….
शालेय विद्यार्थ्यांना स्कुल बॅग आणि दिव्यांगांना साहित्य वाटप तसेच आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन ...

मेहकर (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी):- केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते महाराष्ट्रातील तिसरे आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राचे भूमिपूजन आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा असलेली स्कुल बॅग , दिव्यांगांना साहित्य वाटप आणि एसबीआय फाउंडेशन अंतर्गत एस बी आय एफ जीवन सुरक्षा आरोग्य तपासणीचे उदघाटन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात 23 जूनला करण्यात आले आहे.
केंद्रीय आयुष आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची जन्मभूमी असलेल्या मेहकर तालुक्यातील मादणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 23 जून रोजी होणाऱ्या प्रवेशोत्सव सोहळ्याला मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत त्यानंतर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना संपूर्ण गणवेश वाटप पुस्तक वाटप आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या मदतीने अवंत फाउंडेशन मार्फत आधुनिक सुविधा असलेल्या स्कूल बॅगचा वाटप शुभारंभ होणार आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील 16 हजार विद्यार्थ्यांना ही आधुनिक सुविधा असलेली स्कूल बॅग मोफत देण्यात येणार आहे ..आरोग्य संशोधन विभाग , केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय आणि एडस संशोधन संस्थेअंतर्गत मेहकर येथे 5.6 कोटी रुपयांचे आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे . या केंद्राचा पायाभरणी समारंभ केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय मेहकर येथे होणार आहे त्यानिमित्य एका कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी भवन येथे करण्यात आले या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव माजी आमदार संजय रायमुलकर जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाबराव खरात मेथियस बेंगस्टन प्रथम सचिव व्यापार धोरण आणि आर्थिक कार्य, डेन्मार्क एस बीआयचे राजाराम चव्हाण शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा बळीराम मापारी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश तात्या वाळुकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव भागवान सुलताने पाटील शहर प्रमुख जयचंद भाटिया याच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत याच कार्यक्रमात एस बीआय फाउंडेशन द्वारा एस बी आय एफ जीवतम सुरक्षा अंतर्गत नागरीकांच्या आरोग्य तपासणीचे उद्घाटन मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे . पहिल्या टप्प्यात बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मोताळा चिखली खामगाव जळगाव जामोद या पाच तालुक्यांतील प्रत्येक 5 हजार अशा पंचवीस हजार नागरीकांच्या 17 प्रकारच्या आरोग्य तपासण्या या अंतर्गत करण्यात येणार आहे आणि ॲलिम्को अंतर्गत दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव वाटप शुभारंभ मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालयात विशेष शिबिरव्दारे या साहित्याच वाटप दिव्यांग बांधवांना करण्यात येणार आहे मेहकर येथील भुमिपुत्र शेतकरी भवन येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आय सी एम आर , हिंदुस्तान पेट्रोलियम , अवंत फाउंडेशन,ॲलिम्को ,एस बी आय फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.