सुतार समाज घडवतोय उज्वल भविष्य!…
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे विश्वकर्मा सुतार समाज एकत्रीकरण समितीच्या वतीने आयोजन....

बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- अजय राजगुरे:- सुतार समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा’ कार्यक्रम प्रचंड उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. हा भव्य दिव्य कार्यक्रम विश्वकर्मा सुतार समाज एकत्रीकरण समितीच्या वतीने 13 जुलै रोजी श्री क्षेत्र येलोजी महाराज संस्थान जांभोरा ता. चिखली जि. बुलढाणा या ठिकाणी आयोजित केला आहे. या सोहळ्यात संपूर्ण जिल्ह्यातील विविध शाळांमधून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यासोबतच ज्या विद्यार्थ्यांनी उच्च पदवी प्राप्त केली तसेच जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय नोकरीला लागले आहे अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे.यामुळे त्यांच्या भावी वाटचालीस प्रोत्साहन मिळाले.
या कार्यक्रमाचे आयोजन विश्वकर्मा सुतार समाज एकत्रीकरण समिती बुलढाणा जिल्हा यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैज्ञानिक कृषी विद्यापीठ जालना येथील श्रीकृष्ण सोनुने सर, चिखली विधानसभेचे आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील, मेहकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. श्री. संजयजी रायमुलकर, विवेकानंद आश्रम चे उपाध्यक्ष अशोकजी थोरात हे उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमाला प्रशिक्षक राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे श्री गजानन उगवेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त समाज बांधवांनी आपल्या परिवारासह या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान विश्वकर्मा सुतार समाज एकत्रीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.