Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

राष्ट्रिय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण उत्साहात सपन्न…

Spread the love

जळगाव जामोद :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-(ज्ञानदेव राजनकर):- राष्ट्रिय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी जनजागृती तसेच शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन बुधवार दिनांक २५/६/२०२५ रोजी श्री शंकर संस्थान खेर्डा बु.येथे करण्यात आले होते.

रासायनिक किटकनाशके तसेच खतांचा अवाजावी वापर यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येऊ लागलेले आहे त्यामुळे काळाची पावले ओळखुन शासनाने नैसर्गिक शेती करीता प्रोत्साहनासाठी नैसर्गिक शेती मिशनची सुरवात केलेली आहे. सदर कार्यक्रमाचे प्रास्तावीक करतांना श्री. अविनाश गाडगे, सहाय्यक कृषि अधिकारी यांनी कार्यक्रमाची दिशा तसेच शेतक-यांनी नैसर्गिक शेती का करावी याबाबत सविस्तर माहीती दिली.यानंतर जळगाव जामोद तालुक्याचे नवनियुक्त तालुका कृषि अधिकारी श्री. आर. एन.जाधव साहेब यांनी पारंपारीक व आताची शेती पद्धती यामधील तफावत समजावुन सांगितले, रासायनिक खते , किटकनाशके व तणनाशके यांचे अंश शेतीमधुन व पाण्यामधुन मानवी शरीरात जातात व त्यामुळे आरोग्यावर होणा-या दुष्परीनामाबाबत विस्तृत माहीती दिली शेतीमधे वापरण्यात येणा-या निविष्ठा शेतकऱ्यांनी स्वत: तयार कराव्या त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढ होते त्यामधे निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, मेटासाझीयम , ट्रायकोर्डमा यांचा आपल्या शेतात करावा याबाबत आवाहन केले. त्यानंतर श्री.कृष्णा शिंदे उपकृषि अधिकारी यांनी विषमुक्त अन्नधान्य व भाजीपाला शेतक-यांना तयार करुन स्वतापासुन त्याची सुरवात करावी असे सांगीतले . नेसर्गिक शतीचे प्रमुख आधारस्तंभ जसे जिवामृत बिजामृत आच्छादन व वाफसा परीस्थीती याबाबत माहीती देउुन आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रमात श्री.राजेंद्र उमाळे, मा.अर्थ व बांधकाम सभापती जि.प.बुलडाणा , श्री.प्रविण भोपळे मा. सभापती पं.स.जळगाव जा.,श्री.राजाराम इंगळे, ज्ञानदेव राजनकार, सचिव शंकर संस्थान , योगेश म्हसाळ पो.पा.खेर्डा बु. मारोती वानखडे, मुरलीधर जाधव,पवन सोनुने कृषि सेवक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page