सहकार विद्या मंदिरात विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ; पोलिसांचे समाजप्रबोधन उपक्रम यशस्वी”

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-स्थानिक श्रीमती बसंतीबाई देवकीसनजी चांडक सहकार विद्या मंदिर डोंगर खंडाळा येथे दि.28 जुन 2025 रोजी बुलढाणा ग्रामीण पोलीस व बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सो अध्यक्षा सौ कोमल झंवर मॅडम यांच्या मार्गदर्शनान व्यसनमुक्ती आणि विद्यार्थी जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन करतांना रीता काटकर यांनी केले. यावेळी बुलढाणा ग्रामीण पोलीसचे पोलीस निरीक्षक गजानन कांबळे साहेब, सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद माळी साहेब व टीम, शाळेचे मुख्याध्यापक सतीश रोढे यांच्यासह उपमुख्याध्यापक कैलास देशमाने , पर्यवेक्षक विलास गाढवे आणि शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक करतांना मुख्याध्यापक सतीश रोढे यांनी आयुष्यातील उद्दिष्टे निश्चित करून त्यावर काम करा.जेव्हा उद्दिष्ट स्पष्ट असते, तेव्हा व्यसनांकडे वळण्याची शक्यता कमी होते असे सांगितले.यावेळी आदरणीय भाईजी यांच्या मार्गदर्शनाचे वाक्य “व्यसनमुक्त जीवन म्हणजे स्वतंत्र, सुदृढ आणि यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे” याची आठवण करुन दिली.त्यानंतर, शरद माळी साहेब यांनी बुलढाणा ग्रामीण पोलिसांच्या वतीने व्यसनाचे दुष्परिणाम, समाजिक आरोग्य आणि तरुण पिढीवरील त्याचे गंभीर परिणाम यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विविध उदाहरणे देऊन व्यसनाधीनता कशी जीवनाचा नाश करते, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
त्यानंतर कार्यक्रम अध्यक्ष गजानन कांबळे साहेब यांनी बुलढाणा ग्रामीण पोलिसांच्या वतीने बोलतांना “शाळा ही केवळ शिक्षण देण्याचे नव्हे, तर उत्तम नागरिक घडविण्याचे स्थान असते”.कार्यक्रमाच्या शेवटी व्यसन त्याची सुरवात , त्यापासून दूर राहण्याचे मार्ग, मोबाईल चे व्यसन आदी विषयावर सविस्तर माहिती दिली तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना” व्यसनमुक्तीची शपथ” दिली. त्यात “आम्ही जीवनात कधीही व्यसन करणार नाही आणि इतरांनाही व्यसनांपासून दूर राहण्यासाठी प्रवृत्त करू,” अशी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात घेतली. विद्यार्थ्यांच्या या प्रतिज्ञेने कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबद्दल जनजागृती झाली असून, त्यांना निरोगी आणि व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. बुलढाणा ग्रामीण पोलिसांचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरला आहे.कार्यक्रमाच्या यशस्वी ते करीता बुलढाणा ग्रामीण पोलीसचे अधिकारी, मुख्याध्यापक सतीश रोढे, शाळेचे शिक्षक वृंद, कर्मचारी व इतर सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.