रिमझिम पावसातही सलग दुसऱ्या दिवशी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली दुष्काळग्रस्त भागाची पाहणी …! बांधावर जाऊन दिला शेतकऱ्यांना धीर …!!

बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) रिमझिम पावसातही केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी मेहकर तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्रांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला…
26 जून रोजी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार आणि मेहकर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने या दोन्ही तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जमिनी खरडून गेल्यात या संदर्भाची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री भूमिपुत्र प्रतापराव जाधव हे 27 ला दिल्लीवरून आल्यानंतर 28 जून रोजी त्यांनी लोणार आणि मेहकर तालुक्यातील तालुक्याचा दौरा केला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली सलग दुसऱ्या दिवशी 29 जूनला रिमझिम पाऊस असतानाही भर पावसात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मेहकर तालुक्यातील फर्दापुर , कंबरखेड ,गौंढाळा , भालेगांव , पाचला ,रायपुर , सावत्रा , नायगांव दत्तापुर ,मोसंबेवाडी , उटी , वरवंड ,देऊळगांव साकर्षा या सर्व क्षेत्रात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांना धीर दिला . शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली व प्रशासनालाही तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले