कामात कुचराई करणाऱ्यांची गय करू नका …शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याच काम आरोग्य यंत्रनेने प्रामाणिकपणे करावे …
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्या आरोग्य आढावा बैठकीत केल्या सूचना ...

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ):- सर्व सामान्य गोरगारीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ ,आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतु आहे . हा हेतु साध्य करण्यासाठी आणि शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याच काम आरोग्य यंत्रनेने प्रामाणिकपणे कराव असे आवाहन करत , कामात कुचराई करणाऱ्यावर कडक करवाई करावी अशा सुचना केद्रीय आयुष आरोग्य व कुंटुब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज दिल्यात.
बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आरोग्य विभागाची आढावा बैठक आज 4 जुलै रोजी केंद्रीय आयुष आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी उपरोक्त सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्यात . त्या बैठकीला आरोग्य उपसंचालक डॉ भंडारी , आरोग्य विभागाचे राज्य समन्वयक सोहम वायाळ डॉ जीवन बच्छाव उपसचिव विशाल गुप्ता जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बिराजदार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते उपस्थित होते यावेळी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी सर्वप्रथम जिल्ह्यात आरोग्य विभागात रिक्त असलेल्या जागेचा आढावा घेतला ह्या जागा त्वरीत भरण्याच्या सुचना संबंधित यंत्रणेला दिल्यात शिवाय काही जागा ह्या मुलाखती पद्धतीने 15 दिवसाच्या आत भरण्याचे ही यावेळी सांगण्यात आले . ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांनी सामुहीकरित्या प्रयत्न करणे गरजेचे आहे त्या दृष्टिकोनातून सर्वांनीच एकजुटीने काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्यात . क्षय मुक्त भारत बनविण्याच्यासाठी निक्षयमित्र योजनेत सर्व अधिकारी स्वयंसेवी संघटना लोकप्रतिनिधी यांना सहभागी करूया घ्या अशा सूचना यावेळी केद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्यात .
ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा पुर्ण क्षमतेने कार्यन्वीत करण्यासाठी भौतीक सुविधा पोहचविणे आणि बांधकम हे चांगल्या दर्जाचे करून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले . पी एम जे वाय योजने अंतर्गत आयुष्मान कार्डाची संख्या वाढविण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत तालुकास्तरावर शिबिरे आयोजित करून एक महिन्याच्या आत सर्व लोकांचे आयुष्यमान कार्ड काढण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्यात जिल्ह्यातील जन्मदर आणि मृत्युदरचा ही आढावा यावेळी घेण्यात आला उपचार पद्धतील खर्चा संदर्भात बोर्ड प्रत्येक दवाखान्यात लावण्या संदर्भातील सूचना देण्यात आल्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात अमृत औषधालय आणि जन औषधी केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्यात ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र ग्रामीण रुग्णालय येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना उपचार सुविधा सहज उपलब्ध करून द्याव्यात नागरिकांच्या काही तक्रारी आल्यास त्यास जिल्हाआरोग्य अधिकारी आणि जिल्हाशल्य चिकित्सक यांना जबाबदार धरल्या जाईल असे स्पष्ट निर्देश मंत्री महोदयांनी यावेळी दिलेत.