बुलढाणा अर्बनचे ऑडिट R.A विभाग बुलढाणाचे रिजनल मॅनेजर संजय राजगुरे यांना गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रमाचे निमंत्रण!

बुलढाणा:आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित सुतार समाजाच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा’ कार्यक्रमाचे निमंत्रण आजबुलढाणा अर्बनचे ऑडिट R.A विभाग बुलढाणाचे रिजनल मॅनेजर संजय राजगुरे यांना देण्यात आले. सुतार समाज एकीकरण समिती चे जिल्हाध्यक्ष अनंतराव राऊत यांनी स्वतः संजय राजगुरे यांची भेट घेऊन त्यांना कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
सुतार समाजाच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा’ हा कार्यक्रम 13 जुलै रोजी,सकाळी 11 वाजता, श्री क्षेत्र येलोजी महाराज संस्थान जांभोरा ता. चिखली जि. बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे आणि सलोखा वाढवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
यावेळी बोलताना, श्री.संजय राजगुरे यांनी निमंत्रण स्वीकारले आणि कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल अभिनंदन केले. “समाजाच्या विकासासाठी आणि विविधतेमध्ये एकता साधण्यासाठी असे कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत,” असे ते म्हणाले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. या निमंत्रणामुळे कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली असून, नागरिकांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे.या वेळी गजानन जवरकर, पत्रकार अजय राजगुरे उपस्थितीत होते.