सॉफ्ट स्किल्स विकसीत करणे काळाची गरज.. डॅा वासुदेव गोलाईत

नांदुरा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- स्थानिक श्री पुंडलीक महाराज महाविद्यालय नांदुरा रेल्वे येथील वाणिज्य शाखेच्या वतीने मा. प्रभारी प्राचार्य डॅा अलका मानकर व विभाग प्रमुख प्रा राहुल माहुरे यांच्या मार्गदर्शनात Student Induction Program अंतर्गत “Beyond Books: The Power of Soft Skills in Student Success””पुस्तकांच्या पलीकडे: विद्यार्थ्यांच्या यशात सॉफ्ट स्किल्सची आवश्यकता ” या विषयावर प्रमुख वक्ते प्रोफेसर डॅा. वासुदेव गोलाईत एम ई एस महाविद्यालय मेहकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॅा अलका मानकर होत्या याप्रसंगी विचार मंचावर इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. दादाराव गायकवाड, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा राहुल माहुरे, मराठी विभाग प्रमुख प्रा अनंता लाहुडकर, प्रा सुप्रिया गेडाम उपस्थित होते. पाहुण्यांचा परियच प्रा राहुल माहुरे यांनी करुन दिला.
प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना डॅा वासुदेव गोलाईत म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक जगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भविष्यातील यशासाठी सॉफ्ट स्किल्स (Soft Skills) ची नितांत आवश्यकता आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबरच संवाद कौशल्ये (Communication Skills), समस्या सोडवण्याची क्षमता (Problem-Solving Skills), सांघिक कार्य (Teamwork) आणि लवचिकता (Adaptability) यांसारख्या गुणांवर भर देणे काळाची गरज बनली आहे.अध्यक्षीय भाषणात डॅा अलका मानकर यांनी सांगितले की, “आजचे विद्यार्थी हे उद्याचे व्यावसायिक आणि नागरिक आहेत. त्यांना केवळ तांत्रिक ज्ञान देऊन चालणार नाही, तर त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण, भावनिक बुद्धिमत्ता आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणेही महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रा सुप्रीया गेडाम यांना तर आभार प्रदर्शन प्रा निलकेश धुर्वे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.